
चिपळूण शहरात बहादूरशेख ते एन्रॉन पूल दरम्याने कोस्टल रोड करण्याचा प्रस्ताव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ
चिपळूण शहरातील पाच मुख्यरस्त्यांचा डीपीआर आपण प्रशासनाला करण्याच्या सूचना दिल्या असून वाशिष्ठी नदी करण्याच्या सूचना दिल्या असून किनारी बहादूरशेख ते एन्रॉन पूल दरम्याने कोस्टल रोड करण्याचा संकल्प आहे. शहरातील पाच महत्वाचे रस्ते आपण करणार असून अन्य रस्ते जोडणे व सुस्थितीत करणार असल्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले.
लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रातील पाणी टंचाई निवारणासाठी वाशिष्ठी नदीवर तात्पुरत्या स्वरूपात कॉफरडॅम बांधण्याच्या परवानगीला नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी विरोध दर्शविला. यामुळे गोवळकोटच्या जॅकवेलला पाणी येणार नाही आणि गोवळकोट, पेठमाप भागात पाणी टंचाई निर्माण होईल, असा मुद्दा मांडला. यानंतर सभागृहाने हा विषय स्थगित केला.
चिपळूण नगरपरिषदेच्या नवीन इमारत बांधकामा संदर्भात व स्थलांतर विषय भाजप गटनेते शशिकांत मोदी यांनी उपस्थित केला. मोदी यांनी इमारतीसाठी किमान तीन वर्षे लागतील असे सांगत संपूर्ण वस्तुस्थिती सभागृहासमोर अभ्यासपूर्ण मांडण्याचा प्रयत्न केला. वाढती महागाई, युद्धजन्य परिस्थिती यावर प्रकाश टाकत अजून वेळ गेलेली नाही गरज असेल तर फेरनिविदा काढता येईल असे सूचविले. यावर नगराध्यक्ष सकपाळ यांनी आपण किमान १५ महिन्यात हे काम पूर्ण करू आपण सर्व माहिती घेतली आहे, ठेकेदाराला बोलवून सर्वांसमोर प्रात्यक्षिक दाखवू असे सांगितले आपण १८ महिन्यात इमारत पूर्ण करु असे आश्वासन दिले.




