
भा.ज.पा.तर्फे ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण बूथ क्रमांक 201 वर
💥
भारतीय जनता पार्टी बुथ क्रमांक 201 या ठिकाणी आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३१ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण तेली आळी येथील बूथ क्रमांक २०१ येथे उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी बूथ क्रमांक 201वतीने करण्यात आले होते.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व बूथ क्रमांक २०१ ची बूथ कमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीविषयी, समाजहिताच्या उपक्रमांविषयी तसेच युवक, महिला व शेतकरी सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाजसेवा, जनसंपर्क आणि विकासकामांमध्ये अधिक सक्रिय राहण्याचा संकल्प केला.
महिला जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पक्ष संघटन अधिक बळकट होण्यास मदत होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




