मुन्ना देसाईंवरील कारवाई थांबवा अन्यथा रास्तारोको -परशुराम कदम


जि.प. आणि पं.स. निवडणुकीनंतर हातखंबा गटातील कार्यकर्ते केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर होणार्‍या प्रतिबंधात्मक कारवाया या जाणुनबुजून केल्या जात असल्याचा आरोप जि.प. माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी केला आहे. प्रशासनाने दबावापोटी होणार्‍या कारवाया न थांबवल्यास रास्तारोकोचा इशारा त्यांनी दिला आहे.
जि.प. व पं.स. निवडणुकीत केदार उर्फ मुन्ना देसाई यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांचे काम केले होते. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून जुने विषय उकरून काढून पोलीस व प्रशासकीय यंत्रणेमार्फत प्रतिबंधात्मक कारवाया करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. निवडणुकीनंतर गावात शांततेचे वातावरण असून हे वातावरण बिघडवण्याचे काम प्रशासकीय यंत्रणा दबावाखाली करीत आहे. देसाई हे नेहमीच विविध घटनांमध्ये मदतीला धावणारे म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातच आता शिमगोत्सव येत असून प्रशासनाने दबावापोटी कारवाया थांबवाव्यात असे आवाहन कदम यांनी केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button