
निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

रत्नागिरी : येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि वनराई, पुणे व एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून तसेच, राज्यगीत, कोकण कृषी विद्यापीठ गीत आणि वंदे मातरम गायनाने करण्यात आले. जीवशास्त्रज्ञ वर्षा सदावर्ते यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यु.एन.दि.पी. प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक हृषीकेश भाटकर यांनी या कार्यशाळेतून मत्स्यव्यावसायिक आणि किनारपट्टीवरील लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल आणि मत्स्य व्यवसायास चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राची आणि त्यांच्या कार्याची माहिती दिली. मत्स्य संवर्धनाद्वारे शाश्वत पर्याय विकसित करणे गरजेचे आहे त्यांनी सांगितले.
प्रा. साटम यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अपूर्वा सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी केले.
दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये “खेकडा पालन व निमखारे पाणी व्यवस्थापन” या विषयी अभिरक्षक डॉ. हरीश धमगाये, तर “समुद्री शेवाळ संवर्धन” या विषयी जलजीविका चिन्मय दामले, “मत्स्य शेती : रोग व्यवस्थापन व निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती” या विषयी प्रा. डॉ. आसिफ पागारकर यांनी मार्गदर्शन केले. “मासे तसेच खेकडे काढणी आणि काढणी पश्चात काळजी” यावर प्रा. सचिन साटम यांनी मार्गदर्शन केले. “सागरी शोभिवंत मासे : ओळख व निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य शेती” या विषयी सौ. वर्षा सदावर्ते, जीवशास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी “मत्स्य शेतीचे अर्थशास्त्र” या विषयावर मार्गदर्शन केले. सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रशिक्षण हस्त पुस्तिका वितरीत करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. आसिफ पागारकर, डॉ. धमगये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, वरिष्ठ संशोधन सहाय्यक व्ही. आर. सदावर्ते, ए. एन. सावंत, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक रमेश सावर्डेकर, मत्स्यालय यांत्रिक श्रीकांत तांबे, मनीष शिंदे, वरिष्ठ लिपिक जे. जे. साळवी, बोटमन दिनेश कुबल, शिपाई सुहास कांबळे, मजूर सचिन चव्हाण, क्षेत्र संग्राहक प्रवीण गायकवाड, भूमी भाटकर, तेजस जोशी, प्रशांत पिलणकर, योगेश पिलणकर, स्वप्नील आलीम व अभिजीत मयेकर यांनी परिश्रम घेतले.




