रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथे ७१ हजार रुपयांची वीज चोरी


वाढत्या वीज दरामुळे काही लोकांकडून वीज चोरीचे प्रकार घडत असून रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथे आरोपी फराद शहा याने अंदाजे ७१ हजार रुपयांची वीज चोरी केली असल्याचा प्रकार उघड झाला आहे, याबाबत शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी फराद इकबाल शहा (रा. ओसवाल नगर) याने व त्याच्यासोबत असणार्‍या इसमाने फ्लॅट नं. १०२ दि. ८.४.२०२५ ते ४.२.२०२६ पर्यंत ११ महिन्यांचे ३९३६ युनिट असे अंदाजे ७१ हजार १०० रुपयांची वीज चोरी स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपीने वीज मीटरच्या मागील बाजूस फेरफार करून अतिरिक्त सर्किट जोडल्याचे आढळले. तसेच मीटरची वायर सोल्डर केलेली आढळली. यामुळे मीटर मंदगतीने फिरून त्यावर वीज बिलाची कमी नोंद होत होती. याबाबत सहा. अभियंता निरज देशमुख यांनी रत्नागिरी पोलीस स्थानकात आरोपी फराद शहा याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button