टीआरपी येथे अवजड ‘ग्रेडर’ यंत्राच्या चाकाखाली सापडून वेतोशीतील सायकलस्वार ठार


रत्नागिरी शहरातून कुवारबावकडे जाणाऱ्या मार्गावर टीआरपी येथील साई हॉस्पिटलसमोर काही वेळापूर्वीच एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड ‘ग्रेडर’ यंत्राच्या चाकाखाली आल्याने रघुनाथ बाबी झोरे(रा. वेतोशी, वय-50) या सायकलस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी शहरातून कुवारबावकडे जाणाऱ्या रस्त्यावर टीआरपी येथील साई हॉस्पिटलसमोरून रस्ते बांधणीसाठी वापरण्यात येणारे भव्य ‘ग्रेडर’ यंत्र जात होते. यावेळी तेथून जाणारा एक सायकलस्वार या ग्रेडरच्या चाकाखाली सापडला. या अवजड यंत्राचे चाक थेट सायकलस्वाराच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव रघुनाथ बाबी झोरे असून ते रत्नागिरी तालुक्यातील वेतोशीचे रहिवाशी होते. ते एमआयडीसी मिरजोळे परिसरात बांधकामावर सेंट्रीगचे काम करत होते. सायंकाळच्या सुमारास मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात घडल्याने टीआरपी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली असून वाहतुकीवरही काहीसा परिणाम झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button