चिपळूणमध्ये रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा; आणखी दोन गुन्हे दाखल

नाईक कंपनीजवळ स्विफ्ट डिझायर, तर सावर्डे बाजारपेठेत बोलेरोवर कारवाई

चिपळूण : सार्वजनिक रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चिपळूण आणि सावर्डे पोलीस ठाण्यांत आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत चिपळूण येथील नाईक कंपनीजवळ ताकीया मशिदीशेजारी MH-02-BJ-8387 क्रमांकाची मारुती स्विफ्ट डिझायर गाडी रस्त्यावर उभी करण्यात आली होती. याप्रकरणी महेश हरिश्चंद्र चिले यांनी तक्रार दिली असून, फहीम हुसेन दादरकर (वय ३७) यांच्याविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत सावर्डे बाजारपेठेतील गुडलक हॉटेलसमोर MH-42-K-3533 क्रमांकाची बोलेरो गाडी उभी करून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करण्यात आला. याप्रकरणी सतीश सीताराम कदम यांनी तक्रार दिली असून, सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५५/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button