
जिल्हास्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धेसाठी गणराज क्लब सज्ज
रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन मान्यतेने व संघ रत्नागिरी यांच्या सहकार्याने आयोजित १९ वी क्युरोगी व १३वी पूमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांदो स्पर्धा सन २०२६-२७ रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या बॅडमिंटन हॉल या ठिकाणी ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर तालुक्यांमधून सुमारे ६५० खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी गणराज क्लबच्या खेळाडूंची निवड गणराज क्लब तायक्वांदो अध्यक्षा ॲड. पूजा प्रसाद शेट्ये, महिला प्रमुख प्रशिक्षक आराध्य प्रशांत मकवाना, क्लब उपाध्यक्ष साक्षी मयेकर, सचिव रंजना मोंडूला, प्रशिक्षक डॉ. मयुरेश नडगिरी, आदिती शिवगण, अनिकेत पवार, साहिल शिवगण, शीतल वांयगणकर, शर्मिला वराडकर, आशका रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
या स्पर्धेसाठी गणराज क्लब तायक्वांदो क्लबचे खेळाडू रत्नागिरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असून ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेला विधी दुबे, श्रीनय कदम, मीरा वांयगणकर, युबना संदे, नीरज मकवाना, तीर्था मकवाना, दुर्वा हातिसकर, श्राव्या वाडकर, मानस रहाटे, स्पर्श रेडीज, आध्या रसाळ, अनया वणजू, बरखा संदे स्वराली जाधव, शौर्या जाधव, आर्या वराडकर, अखिलेश वांयगणकर, विहान शेटये, अथर्व मुरकुटे, विहान घाग, अहना रसाळ, केशर शेरे, गौरी विलणकर, त्रिशा मयेकर, समर्थ विचारे, आद्या कवितके, श्रेष्ठा विलणकर आदीची निवड करण्यात आली आहे.
या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिदें, राजेंद्र सावंत, क्लबच्या अध्यक्ष ॲड. पूजा शेट्ये, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा प्रशांत सुर्वे, नगरसेवक पूजा दीपक पवार, नगरसेवक राजन शेट्ये, नगरसेवक सौरभ मलुष्टे, के. एस. पोवार क्लब उपाध्यक्षा साक्षी मयेकर, सदस्य परेश मोडूंळा, स्नेहा मोरे, शलाका जावकर, वरिष्ठ खेळाडूंनीसह पालकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.




