
रत्नागिरी शहरानजिकच्या शीळ वाडकरवाडी येथे भर दिवसा घरफोडी, ५ लाखांचे दागिने लंपास
रत्नागिरी शहरानजिकच्या शीळ वाडकरवाडी येथे चोरट्यांनी भरदिवसा घर फोडून ५ लाख रुपयांचा मुद्दमाल चोरून नेला. ही घटना शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
नीलेश नारायण भातडे (५२, रा. शीळ वाडकरवाडी, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आज त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भातडे यांचे शीळ वाडकरवाडी येथे घर असून घरात कोणीही नसल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी घर फोडले. ३१ जानेवारी रोजी भातडे यांच्या घराचा मागील दरवाजा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला.www.konkantoday.com




