
चिपळूण शहरातील फरशीतीठा येथे वाशिष्ठी नदीत रंगाचे डबे धुतल्याने ’वाशिष्ठी’ रंगीबेरंगी
चिपळूण शहरातील फरशीतीठा परिसरात लोटे एमआयडीसीच्या पंपहाऊस इमारतींना सुरू असलेल्या रंगकामाचे डबे वाशिष्ठी नदीत धुतल्याने पाणी रंगीबेरंगी झाले आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. यासंबंधीची माहिती मिळताच नगरपरिषद पाणी पुरवठा समिती सभापती निहार कोवळे यांच्यासह नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेत रंगकाम थांबवले. संबधित ठेकेदाराला दंड ठोठावण्यात येणार आहे.
फरशीतीठा परिसरात खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीचे पंपहाऊस आहे. सध्या येथे डागडुजीचे काम सुरू असून रंगकामही सुरु आहे. यासाठी रंगाचे डबे आणण्यात आले आहेत. यावेळी रिकामे झालेले डबे वाशिष्ठी नदीपात्रात धुण्याचा प्रताप कामगारांनी केला.
www.konkantoday.com




