रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर येथील कचरा डेपोमध्ये केवळ दोन दिवसांचे नवजात पुरुष जातीचे अर्भक जिवंत अवस्थेत सापडले


रत्नागिरी
रत्नागिरी शहरातून एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शहरातील क्रांतीनगर येथील कचरा डेपोमध्ये केवळ दोन दिवसांचे नवजात पुरुष जातीचे अर्भक जिवंत अवस्थेत आढळून आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे कचरा डेपोच्या परिसरात हे अर्भक पडल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती शहर पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या चिमुरड्याला स्थानिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. सुदैवाने हे अर्भक जिवंत असून पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
सध्या या बालकाला रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (SNCU) डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button