
कोकण नगर येथील दुकान गाळे पाडू नका ,स्वाभिमान पक्षाची मागणी
कोकण नगर येथील नागरिकांना सुविधा देण्याच्या उद्देशाने बॅडमिंटन हॉल व अन्य इमारती बांधण्यात येत आहेत.हे करीत असताना तेथील दुकान गाळे पाडण्यात येणार आहेत. हे गाळे तोडू नयेत अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कोकण नगर प्रभाग अध्यक्ष रफिक मुकादम यांनी पालिकेला निवेदनाद्वारे केली आहे. सध्या या ठिकाणी नगर परिषदेकडून भुईभाडे जागा घेऊन अनेक जण दुकान गाळ्यात व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे हे गाळे तोडल्यास सर्वांवर बेरोजगारीची पाळी येईल असे मुकादम यांनी म्हटले आहे.या इमारती मोकळ्या भूखंडावर बांधण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.
www.konkantoday.com