
राजापूर येथील न.प. निवडणुकीसाठी भाजी मंडई बंद, व्यापार्यांच्यात नाराजी
राजापूर येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न.प. ने सुरक्षेच्या नावाखाली जवाहर चौक ते पॉप्युलर इलेक्ट्रीकल्स पर्यंतचा बाजारपेठेतील हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. मात्र नगरपरिषद इमारतीमधील व्यापार्यांना ११ ते ३ वा. पर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याने व्यापार्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
जवाहर चौक ते पॉप्युलर इलेक्ट्रीकल्स पर्यंतचा बाजारपेठेतील हा रस्ता सकाळी ११ ते दुपारी २ वा. पर्यंत बंद राहील असे फलक नगर परिषदेने लावले आहे. या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र पादचार्यांना हा रस्ता खुला ठेवला आहे. हे करीत असताना दुसरीकडे मात्र नगरपरिषदेने इमारतीमध्ये असलेली भाजी मंडईतील सर्व दुकाने याचवेळी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. यामुळे येथे व्यवसाय करणार्या विक्रेत्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
www.konkantoday.com




