
जिद्दी माउंटेनिअरिंगची मांडवी किनारा स्वच्छता मोहीम
सामाजिक बांधिलकी ठेवत जिद्दी माउंटेनिअरिंग रत्नागिरीच्या वतीने गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर मांडवी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम राबवली होती.समुद्र किनारी आलेले निर्माल्य, प्लास्टिक तसेच अन्य गोष्टी सुजान नागरिकांच्या मदतीने जिद्दी माऊंटेनिअरिंग ने साफ करून समुद्र किनारा स्वच्छ केला.आशिच मोहीम पुन्हा अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मांडवी समुद्रकिनारी आयोजित केली आहे.जिद्दी माऊंटेनिअरिंगच्या धीरज पाटकर यांनी सांगितले की आमची सर्व गणेश भक्तांना एकच सांगण आहे निर्माल्य गोळा करण्यासाठी केंद्र असतानाही आज खूप निर्माल्य समुद्रावर आढळुन आले. प्लास्टिक,थर्माकोल आणि मुख्य म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस चे गणपती याचा वापर अजूनही होतोय. आपल्याला आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी या गोष्टींचा वापर टाळणं गरजेचं आहे.समुद्रात विसर्जन केलेल्या गोष्टी समुद्र कधीच पोटात ठेवत नाही बाहेरच टाकतो. आपणच आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावू पुन्हा होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करू. तसेच पुन्हा पुढच्यावर्षी येणाऱ्या गणेशोत्सवाला या सर्व गोष्टींचा वापर टाळू व शाडू च्या मातीचे बाप्पा घरी आणू.
तुम्ही सगळे उपस्थित राहाल, आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना घेऊन याल अशी अपेक्षा करतो.
www.konkantoday.com