मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम: दावे व हरकती दाखल करण्याची मुदत आता १३ नोव्हेंबरपर्यंत वाढवली


*रत्नागिरी, दि. २ – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ जाहीर झालेला आहे. या कार्यक्रमानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून सध्या दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी सुरू आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत होती. तथापि, भारत निवडणूक आयोगाकडील २९ ऑक्टोबर २०२६ च्या पत्रान्वये या कालावधीत वाढ करण्यात आली असून, दावे व हरकती निकाली काढण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रक:

  • दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी: ३१ ऑगस्ट २०२६ ते १३ नोव्हेंबर २०२६
  • नोटीस कालावधी / दावे व हरकती निकालात काढणे: ३१ ऑगस्ट २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६
  • मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी: ३० नोव्हेंबर २०२६
    मतदारांनी नोंदी तपासून घेण्याचे आवाहन
    मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव, पत्ता, वय आणि जन्मतारीख यांसारख्या तपशिलांची खात्री करून घ्यावी. नोंदींमध्ये काही दुरुस्ती आवश्यक असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. नवमतदारांनी तसेच प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन अंतिम मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.
    तपशील तपासण्यासाठी व नावनोंदणीसाठी उपलब्ध सुविधा:
  • ऑनलाइन सुविधा: ‘सिटिजन सर्व्हिस पोर्टल’ (voters.eci.gov.in) किंवा ‘ECINet’ मोबाइल ॲपद्वारे.
  • ऑफलाइन सुविधा: संबंधित मतदार नोंदणी कार्यालय (तहसीलदार व उपविभागीय अधिकारी कार्यालये) किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button