रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..’ दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा हल्लाबोल!


  • दिल्ली ही नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्या घरची प्रॉपर्टी आहे का? यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे का? सगळ्या मेट्रो बंद करून टाकल्या, रेल्वे बंद करून टाकल्या, रस्ते ब्लॉक करून टाकले, आणीबाणीतही रेल्वे बंद झाल्या नव्हत्या, किती लोकांना डिटेन करतील?

मी चाललोय, मलाही अटक करा, मलाही डिटेन करा. सौरभ दास, आशुतोष रांका तयार आहेत, अशा शब्दात सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांनी हल्लाबोल केला. सीजेपीला दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी परवानगी दिल्ली पोलिसांकडून फेटाळण्यात आली आहे.

ज्ञानेश कुमारने परवानगी घेतली होती का?

अभिजित दिपके म्हणाले, ज्ञानेश कुमारांनी 13 कोटी मतं हटवण्यापूर्वी परवानगी घेतली होती का? सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म 6 मधील बदलाला मंजुरीसुद्धा दिली नव्हती. मग, जेव्हा ज्ञानेश कुमार कोणालाही न कळवता, कोणालाही न विचारता 13 कोटी मतं हटवतो, तेव्हा कलम 19 नुसार मिळालेल्या आपल्या घटनात्मक हक्काच्या आधारावर, त्याच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी परवानगीची काय गरज आहे? जंतर मंतर हे आंदोलनासाठी निश्चित केलेले ठिकाण आहे; कलम 19 आपल्याला आंदोलन करण्याचा घटनात्मक हक्क देते.

मोदी आणि अमित शाहांनी रक्तदाब तपासून घ्यावा

त्यांनी पुढे सांगितले की, आणीबाणीच्या काळात रेल्वे कधीच बंद नव्हती. या सरकारने आमच्या आंदोलनापूर्वी रेल्वे बंद केली. सरकार गरजेपेक्षा जास्तच गंभीर आहे. मला वाटतं, आंदोलनापूर्वी या सरकारला जी भीती वाटतेय, ते पाहता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आपला रक्तदाब तपासून घ्यावा. ज्ञानेश कुमार तुमच्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? यावरून हे स्पष्ट दिसतं की राजाचं आयुष्य पोपटाच्या हातात आहे. ज्ञानेश कुमार तोच पोपट आहे, तुम्ही त्याला पकडले तर राजासुद्धा जाईल, असा टोला सुद्धा लगावला.

10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर सीजेपीचे आंदोलन

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच पार्टी’ 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलन करणार आहे. 2 ऑक्टोबरच्या रात्री, दीपके यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, जर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर देशभरातील कॉकरोच दिल्लीत पोहोचतील. त्याने असेही म्हटले की, जर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरपर्यंत पोहोचण्यापासून रोखले, तर त्यांना जिथे थांबवले जाईल तिथे जंतर मंतर उभारले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button