मुंबई–गोवा महामार्गावर हातखंबा निवळी नजीक दुचाकी घसरून अपघातएक जखमी


मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा नजीक निवळी -बावनदी उतार येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थेची हातखंबा येथे २४ तास कार्यरत असलेली मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक MH 08 AH 5010 वरील चालक धनंजय गोविंद रांबाडे (वय ५२, रा. संगमेश्वर, वांगणी) हे रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जात असताना निवळी बावनदी उतार येथे दुचाकी घसरून अपघात झाला. अपघात दुपारी तीन च्या दरम्यान झाला
अपघाताची माहिती मिळताच रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी पोहोचून जखमी धनंजय रांबाडे यांना तातडीने प्राथमिक मदत देत पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.
अपघाताच्या प्रसंगी वेळेत उपलब्ध झालेल्या या मोफत रुग्णवाहिका सेवेने जखमीला तातडीने वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button