
’इनामी देवस्थान’ नवा कायदा मसुदा पंधरा दिवसात, मंत्रालयाच्या विशेष बैठकीत निर्णय
कोकणातील इनामी देवस्थान जमिनीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन कायदा आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असून पुढील १५ दिवसात त्याचा मसुदा शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत दिली.
जिल्ह्यात पेढे-परशुराम येथील इनामी देवस्थान जमिनींचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असल्याने गेली पाच वर्षे आमदार शेखर निकम पाठपुरावा करत आहेत. महसूल यातूनच मंगळवारी महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासह आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह पेढे-परशुरामचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. या इनामी देवस्थान जमिनींच्या मालकी बैठकीत आमदार शेखर निकम यांनी हक्काबाबत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अडचणींचा मुद्दा ठामपणे मांडला.
www.konkantoday.com




