खेडमध्ये कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

खोपी फाटा परिसरात ४२ वर्षीय व्यक्ती ताब्यात; रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि दुचाकी जप्त

खेड : तालुक्यातील खेड- खोपी फाटा रस्त्याच्या कडेला कल्याण मटका जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर खेड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत प्रभाकर नागनाथ गाडीलोहार (वय ४२, रा. खेड-भडगाव रोड, ता. खेड) याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळत असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान २ हजार रुपये रोख, कल्याण मटका जुगाराच्या नोंदी असलेले वहीसदृश पुस्तक, कार्बन पेपर आणि निळ्या शाईचा पेन, तसेच SP Silver रंगाची TVS Jupiter दुचाकी (क्र. MH 08 BH 6581) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ६९ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.
याप्रकरणी फिर्यादी पोलिस कर्मचारी सुरेंद्र चाळकृष्ण कदम (वय ४९, नेमणूक खेड पोलिस ठाणे) यांनी तक्रार दिली. त्यानुसार खेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१०/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी २.२३ वाजता दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button