मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट


मुंबई शहरात 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीदरम्यान शहरातील काही भागांमध्ये सायरनचा आवाज ऐकू येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या आवाजामुळे घाबरून जाऊ नये, असं बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, शहरात दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे अचानक सायरनचा आवाज ऐकू आल्यास नागरिकांमध्ये भीती किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. हीच शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच नागरिकांना माहिती दिली आहे.मुंबईतील फोर्ट परिसरातील जुने सचिवालय, जोड इमारत तसेच क्रॉस मैदानाजवळील नागरी संरक्षण महाविद्यालयाच्या इमारतीवर प्रोटोटाइप सायरन उपकरणे बसवण्यात आली आहेत. याच ठिकाणी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी सायरनची चाचणी करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button