एसटीचा ‌’आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाईन


प्रवाशांच्‍या सोयीसाठी सुरू केलेल्‍या’आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ योजनेंतर्गत पास पासेस काढण्यासाठी ४ व ७ दिवसांचे प्रवास पास आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवाशांना हे पास काढता येणार आहेत. त्यामुळे आगारातून हस्तलिखित पद्धतीने पास देण्याच्या प्रक्रियेला आता घरबसल्‍या ऑनलाईन पास मिळवता येणार आहे.

एसटीच्‍या वाहतूक विभागाने २९ सप्‍टेंबर रोजी जारी केलेल्‍या परिपत्रकानुसार या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या ४ व ७ दिवसांच्‍या पाससाठी ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू केली आहे. महामंडळाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळ तसेच मोबाईल ॲप्‍लिकेशनमध्ये ही सुविधा उपलब्‍ध आहे.

शासनाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाने https://npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर ‌’आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ योजनेचे पास ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. प्रवाशांनी आवश्यक माहिती भरून ऑनलाईन पास काढता येणार आहे.ऑनलाईन पद्धतीने काढलेला पास प्रिंट स्वरूपात किंवा प्रवाशाच्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात असला तरी वैध मानण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान पासवरील क्‍यूआर कोड वाहक ईटीआयएम मशीनद्वारे स्कॅन करणार आहे. क्‍यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाच्या पासची माहिती ईटीआयएम मशीनवर दिसणार असून, त्यानंतर प्रवाशाचे वैध ओळखपत्र तपासून पात्र प्रवाशाला प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे.

क्‍यूआर कोड स्कॅन न झाल्यास प्रवाशांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून पासची पडताळणी करून घ्यावी, अशा सूचना एसटी प्रशासनाने दिल्या आहेत. या ऑनलाईन सुविधेमुळे प्रवाशांना पास काढणे अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button