मोबाईलवरून पालकांनी रागावल्यानंतर १३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल


देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील काटवली-पड्याळवाडी येथे मोबाईल शाळेत घेऊन गेल्याच्या कारणावरून पालकांनी रागावल्याने वैष्णवी मनवे या १३ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी पदार्थाचे सेवन केल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे काटवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी वैष्णवी हिने आजीचा मोबाईल फोन कुटुंबीयांना न सांगता शाळेत नेला होता. सायंकाळी ती घरी परतल्यानंतर हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यावरून पालकांनी तिला रागावून समज दिली.

यानंतर रात्रीच्या सुमारास तिने घरात असलेल्या विषारी पदार्थाचे सेवन केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास देवरूख पोलीस करीत आहेत.

या घटनेने किशोरवयीन मुलांशी संवाद साधताना पालकांनी अधिक संवेदनशीलता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मुलांच्या वर्तनात बदल जाणवत असल्यास त्यांच्याशी शांतपणे संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना भावनिक आधार देणे महत्त्वाचे असल्याचे या घटनेच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button