मुंबईत ‘कॉक्रोच’च्या आंदोलनाला परवानगी नाकारली, ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी सरकारची दडपशाही; अभिजीत दीपके यांनी दिला ‘जेल भरो’चा इशारा

Cockroach storm surge : देशातील निवडणूक घोटाळ्याचे कथित सूत्रधार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ‘सीजेपी’चे अभिजीत दीपके यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून आंदोलनाला परवानगी न दिल्यास ‘जेल भरो’ करण्याचा इशारा दिला आहे.

मतदार फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रिया राबवण्यापासून निवडणुकीशी संबंधित विविध निर्णय घेताना ज्ञानेश कुमार यांनी कशी मनमानी केली, याचे लेखी पुरावे नुकतेच समोर आले आहेत. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनीच

ते नोंदवून ठेवले आहेत. त्याचबरोबर, ज्ञानेश कुमार यांचे भाजपशी असलेले लागेबांधेही समोर येत आहेत. त्यामुळे देशभरात रोष असून ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे.

आंदोलनाला वांगचुक यांचा पाठिंबा

सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला आहे. ‘देशाच्या व्यवस्थेतील शुद्धीकरणाच्या प्रत्येक प्रयत्नांना माझा पाठिंबा आहे. निवडणूक प्रक्रिया तर सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यातील घोळाची जबाबदारी स्वीकारली गेलीच पाहिजे. ज्ञानेश कुमारांचा राजीनामा झालाच पाहिजे,’ असे वांगचुक म्हणाले. ते नोंदवून ठेवले आहेत. त्याचबरोबर, ज्ञानेश कुमार यांचे भाजपशी असलेले लागेबांधेही समोर येत आहेत. त्यामुळे देशभरात रोष असून ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे.

पोलीस म्हणतात, ध्वनीप्रदूषण होऊ शकते!

‘सीजेपी’च्या आंदोलनाला परवानगी नाकारताना शिवाजी पार्क पोलिसांनी ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक काsंडीचे कारण दिले आहे. हा परिसर शांतता क्षेत्र आणि निवासी आहे. या परिसरात अनेक रुग्णालये आहेत. आंदोलनामुळे येथे ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक कोंडी होऊ शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे. शिवाय, शिवाजी पार्क हे मैदान खेळाव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी वापरू नये, असे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने घातले आहेत, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

आंदोलनाला वांगचुक यांचा पाठिंबा

सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला आहे. ‘देशाच्या व्यवस्थेतील शुद्धीकरणाच्या प्रत्येक प्रयत्नांना माझा पाठिंबा आहे. निवडणूक प्रक्रिया तर सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यातील घोळाची जबाबदारी स्वीकारली गेलीच पाहिजे. ज्ञानेश कुमारांचा राजीनामा झालाच पाहिजे,’ असे वांगचुक म्हणाले.

कॉक्रोच वादळाचा धसका

ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी सीजेपीने 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी आंदोलनाची हाक दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये हे आंदोलन होणार आहे. त्यासाठी ‘सीजेपी’ने पोलिसांची परवानगी मागितली होती, मात्र कॉक्रोच वादळाचा धसका घेऊन या आंदोलनाला परवानगी नाकारली.

विरोध प्रदर्शन हा आमचा हक्क

परवानगी नाकारण्याच्या पोलिसांच्या निर्णयावर दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आंदोलन, विरोध प्रदर्शन करणे हा आमचा हक्क आहे. वेगवेगळ्या मार्गांनी आमचा आवाज दडपण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, तो खपवून घेणार नाही. आंदोलनाची परवानगी न मिळाल्यास गांधी जयंती दिनी जेल भरो आंदोलन करू,’ असा इशारा दीपके यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button