
SIR ला तिसऱ्यांदा मुदतवाढ, मतदारांना मोठा दिलासा, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय?
SIR In Maharashtra : देशासह राज्यात स्पेशल इंटेसिव्ह रिविजन (SIR) अर्थात मतदारांची पडताळणी सूरू आहे.या पडताळणीत एसआयआरचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2026 होती.ही मुदत संपल्यानंतरही अजूनही अनेकांचे फॉर्म मतदारांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत. त्यामुळे निवडणुक आयोगाने पुन्हा एकदा एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे?त्यासोबत महाराष्ट्रातील एसआयआरचे सुधारीत वेळापत्रक नेमके काय आहे? हे जाणून घेऊयात.
एसआयआरचा फॉर्म भरण्याची मुदत 17 ऑगस्ट 2026 ला संपुष्ठात आल्यानंतर निवडणुक आयोगाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ देताना एसआयआरच सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख निश्चित करून राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासंबंधीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने वेळापत्रकात ही सुधारणा करण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना 24 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रारूप मतदार यादीसंदर्भात 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येऊ शकतील. तसेच 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींबाबत नोटीस देणे तसेच त्यांचा निपटारा करण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.




