सागरी किनारपट्टीवर अवैध मच्छीमारी वर नियंत्रणासाठी किनारपट्टीवर लवकरच चौथ्या ’ड्रोन’चे आगमन


सागरी किनारपट्टीवर अवैध मच्छीमारी वर नियंत्रणासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुरुवातीला रत्नागिरी, साखरीनाटे आणि हर्णे या तीन महत्त्वाच्या बंदरांच्या परिसरात तीन विशेष ड्रोन कार्यान्वित करण्यात आले या ड्रोनने समुद्रात बेकायदेशीरपणे मासेमारी करणार्‍या बोटींचे बेट छायाचित्रे व ठोस पुरावे टिपल्यामुळे आजपर्यंत १५०० अवैध नौकांवर थेट कारवाई करणे शक्य झाले आहे. या यशानंतर आता जिल्ह्यासाठी आणखी एक नवीन ड्रोन उपलब्ध करून दिला जाणार असून, तो जयगड येथे कार्यान्वित होणार असल्याचे मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरीकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि अनधिकृत मासेमारीला वेसण घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेला ’हायटेक ड्रोन’ ’चा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे. पारंपरिक गस्तीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याने रत्नागिरी किनारपट्टीवरील अवैध मासेमारी करणार्‍यांचे लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
समुद्र खवळलेला असताना अथवा खराब हवामानात गस्ती नौका समुद्रात उतरवणे धोक्याचे ठरते. यावर मात करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने थेट आकाशातून हवेत उडणार्‍या ड्रोनद्वारे समुद्रावर नजर ठेवण्याचा नाविन्यपूर्ण मार्ग निवडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button