आंबोली घाटात रस्त्यावर भलेमोठे दगड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटमार्गावर पुन्हा एकदा दरडसदृश घटना घडली असून चार नंबर धबधब्याजवळ मुख्य रस्त्यावर दोन ते तीन भलेमोठे दगड कोसळले आहेत. घटना घडली त्यावेळी या मार्गावर वाहतुकीची वर्दळ होती. मात्र, दगड कोसळण्याच्या क्षणी कोणतेही वाहन त्या ठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

सध्या दगड रस्त्यावरच असल्यामुळे दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. घटनास्थळी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी घटनेची तातडीने दखल घेत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरील दगड त्वरित हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत.

महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी जेसीबी यंत्र पाठविण्यात आले असून दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button