दापोलीत भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


दापोली तालुक्यातील हर्णे–आंजर्ले बायपास मार्गावर सोमवारी (६ जुलै) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे नाव बासीद अल्ली दरबार बरमारे (वय ३२, रा. आडे वरचा मोहल्ला, ता. दापोली) असे आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ७ वाजता हॉटेल रेंझींटा परिसरात हा अपघात घडला. आंजर्लेकडून येणारा आयशर टेम्पो (क्र. MH 08 W 9013) भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत असताना समोरून येणाऱ्या सुझुकी ॲक्सेस दुचाकीला (क्र. MH 08 AV 4714) जोरदार धडक दिली.

धडकेनंतर बासीद बरमारे रस्त्यावर पडले. त्यानंतर टेम्पोचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले असून, घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button