
“गुजरातचे दोघं आमचा सह्याद्री पोखरणार का?”; कर्जत भीमाशंकर जंगलातील वृक्षतोडीनंतर राज ठाकरेंचा सवाल!
What exactly did Raj Thackeray say? : कर्जतच्या जंगलातील झाडं तोडली, तिथे गेलो होतो, लाकडे रचून ठेवले होती. जंगलाच्या अंतिम संस्कारला आलोय असं वाटलं. इतक्या वर्षांची जुनी झाडं कोणत्या तरी गुजरात्यासाठी म्हणून कापू टाकतायेत असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. या प्रकल्पाची काय गरज आहे? असा सवाल राज ठाकरेंनी केला. एवढंच गुजरातचे दोघे आमचा सह्याद्री पोखरणार का? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
आम्ही जे सांगू ते महाराष्ट्रात झालं पाहिजे. हा जमिनीचा तुकडा, जंगलाचा तुकडा आम्ही सांगतो त्याला देऊन टाका. हे सगळं वरती ठरतं. मी विधानसभेच्या वेळी पुन्हा सांगत होतो महाराष्ट्र जर यांच्या हाती गेला तर दोन माणसांच्या हाती महाराष्ट्र जाईल आणि ते वाट्टेल ते करतील. ही हिंमत येते कुठून? ही हिंमत येते तुमच्यातूनच. मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. आज रडत बसायचं, राजकीय पक्षांकडे जायचं, त्यांना सांगायचं आमच्यावर अन्याय होतोय वगैरे. निवडणुकीच्या तोंडावर जातीच्या नावावर, धर्माच्या नावार किंवा पैशांसाठी मतदान यांना करायचं. मग हे निवडून येणार, पुन्हा तुमच्यावर वरंवटा फिरवणार, पुन्हा परिस्थिती तीच होणार. असं वागण्याचं कारणीभूत निवडणुकीच्या तोंडावर आत्तापर्यंत कुणाला मतदान केलं, कुणाला निवडून दिलं यात लपलं आहे. ३०-३५ टक्के जनता आणि बाकी निवडणूक आयोग आहेच. माता-भगिनींना १५०० रूपये लाडकी बहीण योजनेतून. अशा योजनांमधून तुम्हाला विकत घेतलं जातं आहे आणि तुमची तोंडं बंद केली जात आहेत.
गुजरातचे दोघे आमचा सह्याद्री पोखरणार का?
महाराष्ट्रात सत्तेत बसलेले लोक आहेत त्यांच्या हातात काहीच नाही. मुख्यमंत्र्यांचं निवेदन मी त्यादिवशी ऐकलं. त्यांनीच सांगितलं की केंद्राने ठरवलं आणि खासगी कंपनीने ठरवलं आणि मग हा प्रस्ताव आम्हाला दिला हे त्यांनीच सांगितलं. मी तुम्हाला म्हणालो तसं हे सगळं वरती ठरतं. उद्योगपती मोदी आणि शाह यांना भेटतात आणि सांगतात की आम्ही जमीन पाहिली आहे आम्हाला प्रकल्प उभारायचा आहे. मग वरून खाली फोन येतात. मग पोलिसांसारखं वागायचं. सिनीयर आला की सॅल्युट करतात. सत्तेची भीती, पदाची भीती वाटते म्हणून हे पण तसंच वागतात. गप्प राहणारा, शांत राहणारा, मान खाली घालून चालणारा असा महाराष्ट्र का? गुजरातचे दोन माणसं महाराजांचा महाराष्ट्र चालवणार का? आमचा सह्याद्री पोखरणार का? आणि आम्ही हतबल झालो आहोत.




