‘लग्नाला होकार दे, नाहीतर जीव देतो’; तरुणाचा मोबाईल टॉवरवर हायव्होल्टेज ड्रामा


लग्नासाठी तरुणीवर दबाव टाकत आत्महत्येची धमकी देणाऱ्या युवकाला सांगली कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे खाली आणले.अजय अविनाश जाधव (वय २२, रा. लिंगायत गल्ली, कुपवाड) असे युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाचा एका तरुणीसोबत वाद झाला होता.

त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी देत कुपवाड एमआयडीसी परिसरातील एका मोबाईल टॉवरवर चढून पोलिसांना ‘११२’ क्रमांकावरून माहिती दिली. संबंधित तरुणीने लग्नास होकार दिल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचे त्याने सांगितले. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस फौजदार जितेंद्र जाधव यांनी युवकाची समजूत काढत त्याला सुरक्षितपणे खाली आणले. या वेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर युवकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चौकशीदरम्यान हा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधित तरुणीला होणाऱ्या त्रासाची दखल घेत पोलिसांनी युवकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button