UAE मार्गे महाराष्ट्रात आलेला ३,६२,००० किलो पाकिस्तानी खजूर जप्त; DRI ची मोठी कारवाई


पाकिस्तानमधून वस्तूंच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातलेली असतानाही तिसऱ्या देशामार्फत माल भारतात आणण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI)मोठी कारवाई करत पाकिस्तानमधून आलेले तब्बल ३६२ मेट्रिक टन म्हणजेच ३ लाख ६२ हजार किलोपेक्षा अधिक सुके खजूर जप्त केले आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.

नाशिकमध्ये १३ कंटेनर जप्त

DRIच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर नाशिक येथील CFS अंबड येथे कारवाई करण्यात आली. यावेळी खजुराने भरलेले १३ कंटेनर जप्त करण्यात आले. हा माल मुंबईस्थित एका कंपनीने आयात केल्याचे तपासात समोर आले आहे. ही खेप संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) जेबेल अली बंदरातून भारतात आली होती. मात्र, आयात कागदपत्रांमध्ये मालाचा मूळ देश म्हणून UAE दाखवण्यात आला होता.

पाकिस्तानी माल लपवण्यासाठी ट्रान्सशिपमेंटचा डाव

प्राथमिक तपासात हा माल पाकिस्तानमधून आल्याची ओळख लपवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने ट्रान्सशिपमेंटची व्यवस्था करण्यात आल्याचे समोर आले आहे.खजूर सुरुवातीला पाकिस्तानमधील कराची बंदरातून कंटेनरमध्ये भरून संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली बंदरात पाठवण्यात आले. जेबेल अली येथे हा माल ट्रान्सशिप करण्यात आला. त्यानंतर खजूर दुसऱ्या कंटेनरमध्ये हलवण्यात आले आणि पाकिस्तानी नागरिकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून भारतात पाठवण्यासाठी दुसऱ्या जहाजावर लोड करण्यात आले.अशा प्रकारे मालाचा मूळ देश पाकिस्तान असल्याची माहिती लपवून तो UAEमधून आयात करण्यात आल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button