श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान पाथरटचा कलशारोहण व कार्तिकी एकादशी सोहळा १९ नोव्हेंबरपासून

पाली : रत्नागिरी तालुक्यातील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान मंदिर पाथरटचा कलशारोहण व वार्षिक कार्तिकी एकादशी व त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव सोहळा १९ ते २४ नोव्हेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत संपन्न होणार आहे. यामधे विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता श्री लक्ष्मी पल्लिनाथ मंदिर पाली येथून बाजारपेठेतून कलशांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ पर्यंत श्रींचा अभिषेक, पूजा, सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत कलश पूजन, होम हवन, धार्मिक विधी, २ ते ४ यावेळेत महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ यावेळेत स्थानिक भजन, सायं.७ ते ७.३० आरती, रात्री ८ ते १० यावेळेत कीर्तन (कीर्तनकार हभप प्रसन्नराज जोशी, रत्नागिरी, हार्मोनिअम चैतन्य पटवर्धन, तबला उदय गोखले.)
२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ यावेळेत श्रींचा अभिषेक, पूजा, सकाळी ९ ते १० यावेळेत कलशारोहण मठाधिपती श्री. ष. ब्र. १०८ महादय्या रवीशंकर शिवाचार्य महाराज (श्री देव रेवणसिद्ध मठ संस्थान रायपाटण, राजापूर यांच्या हस्ते) सकाळी १० ते ११. यावेळेत धार्मिक विधी, दुपारी १२ ते २ यावेळेत खिचडी प्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत महिलांचे हळदी-कुंकू, सायं. ७ ते ८ आरती, रात्री ८ ते ९ स्थानिक भजन, ९ ते १० भोवत्या, पालखी प्रदक्षिणा, रात्री १० वाजता गोष्ट वारीची ए वन म्युझिक हाऊस मुंबई निर्मित गोष्ट वारीची ६० कलाकारांच्या संचासह, रात्री १२ नंतर तुळशी विवाह सोहळा संपन्न होईल.
२२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ यावेळेत श्रींचा अभिषेक, पूजा, सायंकाळी ७ ते ८ यावेळेत आरती, रात्री ८ ते ९ स्थानिक भजन, रात्री १० वाजता – श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान, पाथरट निर्मित दोन अंकी नाटक जीवन रेखा चा प्रयोग होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ यावेळेत श्रींचा अभिषेक, पूजा, सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत मोफत आरोग्य शिबिर (नाडी तज्ञ डॉ. योगेश मुकादम, रत्नागिरी) सायंकाळी ६ ते ७ यावेळेत स्थानिक भजन, ७ ते ७.३० आरती, ७.३० ते ९.३० हरिपाठ ओम आदिनाथ ऐक्यवर्धन शिष्य मंडळ (माळवाशी करडेवाडी ता. संगमेश्वर यांचा) रात्री १० वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
२४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजता श्रींचा अभिषेक, पूजा, सकाळी ९ ते ११ श्री सत्यनारायण पूजा, आरती, दुपारी १२ ते १.३० लोटांगण प्रदक्षिणा, दुपारी १.३० ते सायंकाळी ४ यावेळेत महाप्रसाद, ६ ते ७ यावेळेत स्थानिक भजन, ७ ते ७.३० पर्यंत आरती, सायं. ७.३० ते ८.३० जंबुकेश्वर भजन मंडळ हातखंबा, डांगेवाडी यांचे भजन, रात्री ८ ३० ते १०.३० लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम, रात्री १०.३० कलगी तुऱ्याचा जंगी सामना शक्तिवाले शाहिर ऋषिकेश कदम (खेड), तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमण (लांजा) कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल.
श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान पाथरट यांच्यातर्फे कलशारोहण व कार्तिकी उत्सव सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button