भाजप युवा मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या शहर कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर

अमृत गोरे यांची उपशहराध्यक्षपदी, तर चिन्मय प्रभू यांची शहर सरचिटणीसपदी नियुक्ती

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी दक्षिण युवा मोर्चाच्या शहर कार्यकारिणीच्या नियुक्त्या १६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये अमृत अंकुश गोरे यांची रत्नागिरी दक्षिण युवा मोर्चाच्या रत्नागिरी शहर उपशहराध्यक्षपदी, तर चिन्मय सुरेश प्रभू यांची भाजप युवा मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या रत्नागिरी शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.

रत्नागिरी शहरप्रमुख दादा ढेकणे व युवा मोर्चा शहराध्यक्ष अजिंक्य केसरकर यांच्या आदेशानुसार रत्नागिरी शहर युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, महाराष्ट्र युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विक्रांत जैन, महाराष्ट्र युवा मोर्चाचे सचिव अद्वैत कुलकर्णी, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, नगरसेवक नितीन जाधव, मनोज पाटणकर, जिल्हा महिला मोर्चाच्या सौ. वर्षा ढेकणे यांच्यासह अन्य शहर उपाध्यक्ष, नगरसेवक, बूथप्रमुख, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. युवा मोर्चाच्या माध्यमातून संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविणे, युवकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडणे तसेच शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, या दृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button