रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी, सातबारा डिजिटलायझेशन १०० टक्के


रत्नागिरी जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाने कौतुकास्पद कामगिरी करत यशोशिखराकडे आणखी एक पाऊल टाकले आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ तालुक्यांमधील सातबारा उतारे संगणकीकृत करण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. ’डिजिटल इंडिया चे स्वप्न प्रत्यक्षात आणतानाच महसूल कारभार अधिक पारदर्शक व सुलभ करण्याच्या दृष्टीने हा एक मैलाचा दगड मानला जात आहे. या महामोहिमेत जिल्ह्यातील तब्बल २१ लाख ११ हजार ९८८ सर्व्हे क्रमांकांचे संगणकीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यामुळे शेतकरी व जमीनदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या व्यापक संगणकीकरण मोहिमेमध्ये रत्नागिरी तालुक्याने सर्वाधिक ३ लाख २१ हजार ७६१ सर्व्हे क्रमांकांचे काम पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकणातील दुर्गम भाग, तांत्रिक नेटवर्कच्या समस्या अडचणी आणि जमिनीच्या प्रत्यक्ष नोंदींची पडताळणी अशी अनेक आव्हाने समोर होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने महसूल विभाग, भूमी अभिलेख कार्यालय आणि संगणक ऑपरेटर यांच्यात उत्तम समन्वय साधत ही मोहीम युद्धपातळीवर फत्ते केली. सर्व यंत्रणांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळेच हे अशक्य वाटणारे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले आहे शेतकर्‍यांना घरबसल्या सातबारा संगणकीकृत नागरिकाना स्वरुपात स्वतःचा सहजरीत्या सातबारा; गैरप्रकारांना बसणार आळा बसणार आहे. उत्तारे १०० टक्के संगणकीकृत झाल्यामुळे आता आणि शेतकर्‍याना सातबारा डिजिटल घरबसल्या अत्यंत सहजरित्या उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button