चिपळूणातील हॉटेलवर एलसीबीची कारवाई; कथित वेश्या व्यवसायप्रकरणी महिला अटकेत


चिपळूण शहरातील एका हॉटेलमध्ये कथितरित्या सुरू असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसायावर रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने छापा टाकत एका ३९ वर्षीय महिलेला अटक केली. या कारवाईदरम्यान २३ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली असून, न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांना शहरातील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर कथित अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी कारवाई केली.

तपासादरम्यान, मुंबईतील २३ वर्षीय तरुणीला या ठिकाणी आणून तिच्याकडून कथितरित्या अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईनंतर संबंधित तरुणीची सुटका करण्यात आली असून, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला संबंधित संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button