
घराच्या गच्चीची साफसफाई करताना पाय घसरुन प्रौढाचा मृत्यू
घराच्या गच्चीची साफसफाई करताना पाय घसरुन खाली पडल्याने प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष बाळकृष्ण देसाई (५८, रा. ओरी रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. संतोष हे १५ ऑगस्ट रोजी विनिता साळवी यांच्या घराच्या गच्चीवर साफसफाई करत होते. यावेळी त्यांचा पाय घसरल्याने ते गच्चीवर खाली कोसळले. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषीत केले.




