
अॅड. सुष्मिता शिंदे यांची आपच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
पक्ष कार्यालयात नियुक्तीपत्र प्रदान; पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती

रत्नागिरी, दि. १५ ऑगस्ट २०२६ :
आम आदमी पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा संघटनेत महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली असून अॅड. सुष्मिता शिंदे यांची आम आदमी पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवार, १५ ऑगस्ट रोजी पक्षाच्या रत्नागिरी येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र जाधव यांच्या हस्ते अॅड. सुष्मिता शिंदे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव हबीब बावानी, पक्षाच्या PRO जिया मुल्ला, रत्नागिरी तालुका अध्यक्ष वाहिदा काझी, तालुका सचिव हरीश गुरव, संगमेश्वर तालुका अध्यक्ष सचिन अपिस्त्ये, आप महिला आघाडीच्या प्रभारी रुक्साना प्रभुलकर, आप युवा आघाडीचे प्रभारी झिकू बावानी, तसेच खलील वस्ता, सुहास शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
अॅड. सुष्मिता शिंदे यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पक्षाची विचारधारा, जनसामान्यांचे प्रश्न आणि संघटन विस्तारासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार अॅड. शिंदे यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र जाधव यांनी अॅड. सुष्मिता शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
कार्यकर्त्यांच्या उत्साही उपस्थितीत पार पडलेल्या या नियुक्ती सोहळ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आम आदमी पार्टीच्या संघटनात्मक वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.




