पर्ससीन नेट नौकांकडून नियमभंग, शाश्वत मच्छिमार हक्क संघाचा आरोप


राज्याच्या सागरी क्षेत्राबाहेर म्हणजेच १२ नॉटिकल मैलांच्या पुढे खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी एक्सेस परवाना मिळालेल्या पर्ससीन नेट नौका राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारी करीत असल्याचा आरोप शाश्वत मच्छिमार हक्क संघाने केला आहे. अशा नौकांची किनार्‍यावरून छायाचित्रे घेऊन सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली असून संबंधित नौकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे संघाचे नेते छोटू भाटकर यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर संघाच्या कार्यकर्त्यांनी किनार्‍यावरून संबंधित पर्ससीन नेट नौकांची छायाचित्रे घेतली. ही छायाचित्रे आणि संबंधित माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली असून, अशा प्रकारे राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारी करणार्‍या नौकांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button