गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. मयुरेश पंडित यांना पेटंट प्राप्त

'ई-कॉमर्स' क्षेत्रातील वित्त व्यवस्थापनावर यशस्वी संशोधन

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या र. प. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय आणि र. वि. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील लेखाशास्त्र (Accountancy) विभागातील सहाय्यक प्राध्यापक मयुरेश मुरलीधर पंडित यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी पेटंट (Patent) बहाल करण्यात आले आहे.

‘फायनान्स मॅनेजमेंट डिव्हाइस फॉर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म’ (Finance Management Device for E-Commerce Platform) या विषयावरील त्यांच्या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून ही मान्यता मिळाली आहे.

सध्याच्या डिजिटल युगात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील आर्थिक व्यवहार आणि वित्त व्यवस्थापन अधिक अचूक, पारदर्शक व सुलभ व्हावे, या उद्देशाने प्रा.पंडित यांनी हे विशेष उपकरण विकसित केले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे ई-कॉमर्स क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक नियोजन आणि लेखाजोखा ठेवणे अधिक सोपे होणार आहे.

प्रा. मयुरेश पंडित हे सेट, नेट आणि जीडीसी अँड ए पात्रताधारक असून, ते वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत ‘लेखाशास्त्र’ या विषयात पीएच.डी. करत आहेत. त्यांना या संशोधनासाठी त्यांना ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

प्रा. मयुरेश पंडित यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष ॲड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य, लेखाशास्त्र विभागातील सहकारी प्राध्यापकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button