
राजेश झगडे यांना कोकण विभागस्तरीय ‘गुणवंत पुरस्कार २०२६’ जाहीर
दापोली ) :महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, कोकण विभागाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठीत ‘गुणवंत पुरस्कार २०२६’ दापोली तालुका शिक्षकेतर संघटनेचे धडाडीचे व अभ्यासू व्यक्तिमत्त्व श्री. राजेश रेश्मा रमेश झगडे सर यांना जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेले अभ्यासू काम आणि संघटनेतील त्यांचे उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन कोकण विभागामार्फत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा व दापोली तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




