
सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी
डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, पाली प्रशालेमध्ये आज आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून केजी सेक्शन ते सेकंडरी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करत टाळांच्या गजरात एका भव्य दिंडीचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्ये होते की, विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा ठेका धरत पारंपरिक वेशभूषेत लक्ष वेधून घेतले.टाळ-मृदंगाच्या गजरात आणि दिंडीच्या ठेक्यात विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करत संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. या कार्यक्रमांतर्गत “प्रत्येक निरक्षर व्यक्ती साक्षर होऊ” हा मुख्य उपक्रम राबवण्यात आला. यादरम्यान विद्यार्थ्यांनी साक्षरतेचा प्रसार करणारी विविध प्रभावी घोषवाक्ये व स्लोगन्स हातात घेऊन समाजप्रबोधन केले.
विद्यार्थ्यांच्या दिंडीसोबतच शिक्षकांनी देखील विशेष सहभाग नोंदवला. शाळा परिसरात रिंगण आखून, विठोबाच्या भक्तीत तल्लीन होत शिक्षकांनी अत्यंत सुंदर व आकर्षक रिंगण नृत्य सादरीकरण केले.
इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.



