
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनारत्नागिरी तालुक्यातील 546 शेतकरी सभासद पात्र- सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील
रत्नागिरी, दि. 2 ) : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 546 शेतकरी पात्र ठरले आहेत, अशी माहिती सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील यांनी दिली.
सहाय्यक निबंधक श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ जाहीर केली आहे. या योजनेसाठी रत्नागिरी तालुक्यातील 546 शेतकरी सभासद पात्र ठरले आहेत. त्यापैकी 518 शेतकरी सभासदांच्या अपलोडींगचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 28 सभासदांच्या अपलोडींगचे काम काही तांत्रिक कारणांमुळे राहीले आहे. तेही लवकरच पूर्ण होईल.
सर्व शेतकऱ्यांनी आपले अॕग्रीस्टॅक फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्यावेत आणि ते मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव यांच्याकडे जमा करावेत. ही कर्जमाफी 2 लाखांपर्यंत असणार आहे. त्याची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत आहे. प्रोत्साहनपर लाभ हा रु. 50 हजार जास्तीत जास्त दिला जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये या योजनेमुळे समाधान पसरले असून, त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.
000




