पाचल बाजारपेठेत गांजाचे सेवन करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल


राजापूर : तालुक्यातील पाचल बाजारपेठेत सार्वजनिक ठिकाणी गांजासदृश अंमली पदार्थाचे सेवन करताना एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू गुलवा तुरी (वय ३२, रा. झारखंड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. दि. २४ जुलै २०२६ रोजी पाचल बाजारपेठेतील सार्वजनिक ठिकाणी एका झाडाच्या आडोशाला तो बेकायदेशीररीत्या गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रामदास बाबासो पाटील यांच्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९४/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(सी) व २७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेमुळे पाचल परिसरात खळबळ उडाली असून, तालुक्यात अंमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत आहे, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button