निकषाची पूर्तता न केल्यामुळे जिल्ह्यात १ लाख ५ हजार ’लाडक्या बहिणी’ अपात्र


महिला व बाल कल्याण विभागामार्फत झालेल्या कड़क छाननी प्रक्रियेमध्ये विविध तांत्रिक त्रुटी आणि निकषाची पूर्तता न केल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५ हजार ५२१ बहिणीचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ७७ हजार ४७७ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले यापैकी २ लाख ७१ हजार ९५६ पात्र लाभार्थी महिलांच्या बैंक खात्यावर योजनेचा लाभ यशस्वीरीत्या जमा करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सुमारे ४० कोटी ६६ लाख रुपयापेक्षा जास्त निधी धेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे तर दुसरीकडे, विविध कारणांमुळे तब्बल १ लाख ५ हजार ५२१ अर्ज अपात्र ठरल्यामुळे शासनाचा महिन्याला मिळणारा सुमारे १५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी वाचला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button