
दाभोळ मध्ये पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मातृत्व प्रदान, तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
*दापोली तालुक्यातील दाभोळ परिसरातून एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ५ महिन्यांची गरोदर केल्याप्रकरणी ४० वर्षीय आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश कृष्णा फणसकर (रा. ढोरसई, दाभोळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी राकेश याने पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत गेल्या वर्षभरापासून तिला जंगलात नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडित मुलीच्या प्रकृतीत बदल जाणवू लागल्याने तिला उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, ती ५ महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. हा प्रकार उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पीडितेच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात सुरुवातीला शून्य क्रमांकाने गुन्हा नोंद करण्यात आला होता, त्यानंतर पुढील तपासासाठी सर्व कागदपत्रे दाभोळ सागरी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत




