मत्स्य व कोळंबी संवर्धन प्रकल्पांची नोंदणी व नूतनीकरण ३१ डिसेंबरपर्यंत करण्याचे आवाहन अन्यथा ‘एमपीईडीए’ (MPEDA) नोंदणी रद्द होणार; मत्स्यव्यवसाय विभागाचा इशारा


रत्नागिरी, दि. २६ ): तटीय जलकृषी प्राधिकरण कायदा, २००५ नुसार सर्व निमखारे पाणी मत्स्य आणि कोळंबी संवर्धन प्रकल्पांची ‘तटीय जलकृषी प्राधिकरण’ (CAA) कडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर, सागरी उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA) अंतर्गत ‘NaCSA’ प्रणालीत नोंदणीकृत (Enrolled) असलेल्या सर्व मत्स्यशेती प्रकल्पांनी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत तटीय जलकृषी प्राधिकरण, चेन्नई किंवा संबंधित राज्य मत्स्यव्यवसाय विभागाकडून वैध नोंदणी अथवा नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे. मुदतीपूर्वी नोंदणी किंवा नूतनीकरण न केल्यास संबंधित प्रकल्पांची ‘एमपीईडीए’ अंतर्गत असणारी नोंदणी रद्द केली जाईल. तसेच, ज्या प्रकल्पांची नोंदणी किंवा नूतनीकरण पूर्ण होणार नाही, त्यांच्यावर तटीय जलकृषी प्राधिकरण कायदा, २००५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त जी. द. सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
बंद प्रकल्पांची माहिती १५ नोव्हेंबरपर्यंत देणे आवश्यक
ज्या शेतकऱ्यांचे अथवा संस्थांचे प्रकल्प बंद किंवा अवसायानात गेले आहेत, त्यांनी त्याबाबतची लेखी माहिती १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत खालील पत्त्यावर सादर करावी:
पत्ता: सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), परटवणे, मिऱ्या हायवे रोड, पालकर हॉस्पिटलच्या मागे, रत्नागिरी – ४१५ ६१२.
अधिक माहिती व शंकांच्या निरसनासाठी ९१५२५६२९७६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
नोंदणी/नूतनीकरण प्रलंबित असणारे शेतकरी व फर्म्स:
खालील प्रकल्पधारक शेतकरी आणि फर्म्सनी आपल्या प्रकल्पांची नोंदणी/नूतनीकरण तातडीने पूर्ण करून घ्यावे:
दाऊद हमदुले, केळबाई एक्वा फार्म, संतोष यशवंत अग्रे, सफाना एक्वा प्रा. लि., नितीन एक्वा फार्म, बशीर उस्मान फकीर, सुभाष वसंत वायंगणकर, प्रदीप जयराम मांजरेकर, सदानंद भिकाजी लाड, विनायक पोशाजी वैती, सुषमा शिवकर, प्रकाश एकनाथ मुकादम, संजय प्रभार सावंत, अजित अरविंद प्रभूदेसाई, महेश केळकर, मनीष महेंद्र साळवी, मनोज सुरेश केळकर, सुधाकर विनायक प्रभुदेसाई, उल्हास गोविंद प्रभु देसाई, अमृत, विजय रामचंद्र पाटकर आणि विजया गोपीनाथ विचारे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button