झाडे लावून व त्यांचे पालकत्व स्वीकारत रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये अनोखी गुरुपौर्णिमा साजरी

वाटूळ (ता. राजापूर) : रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट (आदर्श विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज), वाटूळ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक आगळावेगळा उपक्रम राबविला. डीएमएलटी (लॅब टेक्निशियन ) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वाटूळ आणि ओनी परिसरात विविध प्रकारची वृक्षरोपे लावून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

              या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ वृक्षारोपण करून थांबले नाहीत, तर प्रत्येक झाडाचे *पालकत्वही* *स्वीकारले* . प्रत्येक विद्यार्थ्याने आपण लावलेल्या रोपाची नियमित देखभाल, पाणी देणे, संरक्षण करणे आणि त्याची वाढ होईपर्यंत जबाबदारीने संगोपन करण्याचा संकल्प केला. त्यामुळे हा उपक्रम केवळ औपचारिक न राहता पर्यावरण संवर्धनाची दीर्घकालीन चळवळ ठरला.

आजच्या काळात अनेक संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा साजरी करतात; मात्र समाजाला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वृक्षारोपणासह त्यांचे पालकत्व स्वीकारण्याचा अभिनव उपक्रम रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांचा हा सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या उपक्रमाबद्दल रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, वाटूळ येथील सर्व विद्यार्थ्यांवर संपूर्ण जिल्हा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, पालक, शिक्षक व पर्यावरणप्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली तर भविष्यात अधिक हिरवागार आणि निरोगी समाज निर्माण होईल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट च्या प्रिन्सिपल मॅडम श्रीमती अंजली पवार मॅडम म्हणाल्या की रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रहिताचे उपक्रम सातत्याने राबवत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button