
चिपळूण तालुक्यातील नागवे येथे समाधीस्थळ तोडफोड प्रकरणी १७ जणांवर गुन्हा
चिपळूण तालुक्यातील नागवे येथे जुन्या परंपरांगत दफनभूमी व समाधीस्थळाच्या कथित तोडफोडप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश पुतळाजी शिंदे, प्रकाश बाबू चिपळूणकर, विष्णू भीमाजी साळवी, सुरेश बाबू साळवी, सुशांत श्रीधर साळवी, सुरेश नारायण साळवी, संजय अनंत झगडे, दीपक विठ्ठल साळवी, रामचंद्र कृष्णा वीर, दत्ताराम कृष्णा वीर, अनंत भीमाजी साळवी, महादेव गणपत साळवी, दीपक यशवंत चिपळूणकर, सभाजी पांडुरंग बगडे मंगेश मनोहर निगडे (सर्व-नागावे) तसेच जेसीबी आणि ट्रॅक्टरचे चालक व मालक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद जानेवारी रोजी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात शिवाजी दत्ताराम पालांडे नागावे) यांनी दिली होती. त्यामध्ये पालांडे कुटुंबियांचे पूर्वजाचे दफनविधीचे श्रद्धास्थान नागावे येथे आहे. त्यात परवानगी शिवाय प्रवेश करून पूर्वजांच्या दफनविधी चौथर्याचे जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने नुकसान करून भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.




