ST प्रवासात सवलत मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून हे कार्ड अनिवार्य!


अखेर नाही नाही म्हणता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य केलं आहे. जे एसटी प्रवासी तिकीट सवलतीचा फायदा घेतात अशा प्रवाशांसाठी म्हणजेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक आहे.
१ ऑगस्टपासून हे कार्ड प्रवाशांना प्रवासावेळी जवळ ठेवावं लागणार नाही. जर जे कार्ड नसेल तर तुम्हाला सवलतीत प्रवास करता येणार नाही.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे डिजिटलायझेशन आणि तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशाने NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी तसे संकेत दिलेच होते. NCMC कार्डमुळे प्रवासी व्यवस्थापन प्रणालीचे आधुनिकीकरणही होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button