मोदी सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल पंपावर इंधन खरेदी करण्यासाठी नवा नियम, एका व्यक्तीला किती लीटर मिळणार?


पश्चिम आशियात अमेरिकेने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर उलथापालथी सुरू आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याने इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मागील काही दिवसांपासून अमेरिका-इराण दरम्यानचा तणाव वाढला आहे. त्यामुळे होर्मुझमधील वाहतूक बंद झाली आहे. मात्र, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने डिझेल खरेदी करण्यासाठी आता मर्यादा निश्चित केली आहे. यामुळे साठेखोरी करणाऱ्यांना आळा बसेल असे म्हटले जात आहे.

देशात इंधनाची साठेबाजी होऊन टंचाई स्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारने पावले उचलण्यास मदत केली आहे. सरकारने एका आता प्रति व्यक्ती किती डिझेल खरेदी करता येईल, याचे आदेश जारी केले आहेत. आता एका व्यक्तीला २०० लीटरपेक्षा अधिक डिझेल खरेदी करता येणार नाही.

केंद्र सरकारने आज, म्हणजेच शुक्रवारी किरकोळ पेट्रोल पंपांवरून हाय स्पीड डिझेल (HSD) च्या विक्रीवर मर्यादा आणण्याचा मोठा आदेश जारी केला आहे. नव्या नियमांनुसार, आता कोणत्याही ग्राहकाला एका दिवसात जास्तीत जास्त २०० लीटर डिझेलच विकले जाऊ शकणार आहे. म्हणजेच, प्रत्येक ग्राहकासाठी प्रतिदिवस डिझेल खरेदीची ही सर्वोच्च मर्यादा असणार आहे.

सरकारने हा निर्णय का घेतला?

डिझेलची साठेबाजी, अनावश्यक साठवणूक आणि संभाव्य काळाबाजार रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत काही भागांमध्ये इंधनाची अतिरिक्त खरेदी आणि साठा वाढण्याची भीती निर्माण झाली होती, हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी काय नियम?

सरकारी आदेशानुसार, ज्या ग्राहकांना व्यावसायिक किंवा औद्योगिक कामासाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता असते, त्यांनी इंधनाची खरेदी त्यांच्या अधिकृत सुविधा, डेपो किंवा निश्चित केलेल्या पंपांवरूनच करावी लागणार आहे. मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी करणाऱ्या ग्राहकांमुळे किरकोळ (रिटेल) पेट्रोल पंपांच्या नेटवर्कवर अतिरिक्त ताण पडू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button