
भंगार व्यावसायिकाकडे चोरीची दुचाकी असल्याचा संशयितावर गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील भंगार व्यावसायिकाकडे आढळून आलेली दुचाकी चोरीची असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. रियाज फारुख अफराज (२१, रा. चर्मालय रत्नागिरी) असे व्यावसायिकाचे नाव आहे. बुधवारी गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही दुचाकी भंगार व्यावसायिक रियाज याच्याकडे दिसून आली. याबाबत त्याच्याकडे गाडीची कागदपत्रांची विचारणा केली असता याबाबत संमाधानकारक उत्तरे त्याने पोलिसांना दिली नाहीत. त्यानुसार ही दुचाकी चोरीची असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आहे. तसेच संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




